विवाहित तरूणी रात्रीच्यावेळी प्रियकराला भेटण्यासाठी चक्क त्याच्या गावात गेली, मात्र पुढे..

प्रियकर आणि प्रेयसी यांचे अनेक भन्नाट किस्से आपण पाहिले आहेत. सध्या अशाच एका भन्नाट घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सारण येथे एक विवाहित तरूणी रेखा कुमारी हिचे शेजारील गावात राहणाऱ्या 21 वर्षीय सुजीत कुमार या तरुणासोबत अनेक महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.

एवढेच नव्हे तर त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. मात्र, या तरूणीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न एका दुसऱ्या मुलासोबत लावून दिले होते. रेखाचे लग्न झाले असले तरीही तिचे तिच्या प्रियकरावरचे प्रेम काही कमी झाले नव्हते. त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. दोघेही रोज फोनवर बोलत असत.

यामुळे त्या दोघांचे एकमेकांवरील प्रेम आणखी वाढत गेले होते. एके दिवशी रेखाने सासरी काहीतरी कारण सांगून रात्रीच्यावेळी तिच्या प्रियकराला म्हणजेच सुजितला भेटण्यासाठी त्याच्या गावात गेली.

त्यावेळी या दोघांना गावातील लोकांनी पकडले. त्यावेळी गावातील लोकांनी त्या दोघांची चौकशी केली, तेव्हा त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचे आहे असे सांगितले. परंतु, घरच्यांनी दुसऱ्या तरुणासोबत लग्न लाऊन दिले आहे मात्र, तिचे प्रेम सुजीतवरच आहे असे रेखाने सांगितले.

त्यामुळे गावकऱ्यांनी या दोघांच्याही कुटुंबियांना यासंबंधी माहिती दिली आणि दोघांचे लग्न लावून दिले पाहिजे असे त्यांनी कुटुंबियांना सांगितले. त्यांनतर सगळ्यांच्या संमतीने गावकऱ्यांसमोर दोघांचे मंदिरात लग्न लावून दिले. सध्या या लग्नाची सो’श’ल मी’डि’या’व’र तूफान चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page