मुलीपासून दूर राहून केली परीक्षेची तयारी, SDM अधिकारी बनून लोकांच्या बोलण्याला दिले चोख प्रत्युत्तर..

जर तुमच्यात स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर कोणतेही संकट तुम्हाला रोखू शकत नाही. आज आपण अशीच एका महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या मुलीपासून दूर राहून आपले स्वप्न पूर्ण केले. लखनऊ मधील इंदिरा नगर येथील रहिवासी असलेल्या पूनम गौतम यांनी आपले शिक्षण हिंदी माध्यमातून पूर्ण केले आहे.

पुढे 12वीनंतर 2011 मध्ये त्यांनी मोती लाल नेहरू मेडिकल कॉलेज प्रयागराजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2015 मध्ये केजीएमयूमधून त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पूनम ह्या एक स्त्री रो’ग विशेषज्ञ आहेत. अनेकदा लोक मुलगी झाली की दु:खी आणि मुलगा झाल्यावर मिठाई वाटतात.

मुलींना ओझं मानण्याऱ्या याच लोकांची वृत्ती त्यांना बदलायची होती. म्हणून त्यांनी नागरी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. नागरी सेवेत गेल्यानंतर त्यांना मुलगा-मुलगी हा भे’द’भा’व नष्ट करण्याचे काम करायचे होते. यामध्ये त्यांना त्यांच्या सासरच्या लोकांनी देखील चांगली साथ दिली.

पुनम यांना 5 वर्षांची मुलगी आहे. मुलीच्या संगोपनाची आणि घरच्या जबाबदाऱ्या त्यांच्या डोक्यावर होत्या. मात्र, तरीही त्या दवाखाना सांभाळण्यापासून ते मुलीची काळजी घेण्यापर्यंतची सर्व कामे अतिशय उत्तमप्रकारे पार पाडत असत.

पूनम यांनी जेव्हा नागरी सेवेसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही लोकांनी त्यांना मागे खेचण्याचा अनेकदा प्रयत्नही केला. परंतु त्या अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवत राहिल्या आणि चांगली तयारी करून त्यांनी युपीएससी परिक्षा दिली.

प्रथम पूनम यांनी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार योग्य रणनीती बनवली. त्यांनतर त्यांनी आपली रणनीती चांगल्या प्रकारे राबवली आणि कठोर परिश्रम देखील घेतले. त्यांनी त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवला. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या नेहमी पुढे जात राहिल्या. दोन वेळा त्यांना अपयशही आले पण त्यांनी हार मानली नाही.

अखेर 2019 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात पीसीएसमध्ये पुनम यांनी अव्वल स्थान पटकावले. त्यांना अपेक्षित यश मिळाले आणि त्यांच्या संघर्षाचे फळ त्यांना मिळाले. पीसीएस उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली, परंतु समाजसेवेसाठी त्यांनी आपले हे स्वप्न पूर्ण केले, असे त्या म्हणतात. त्यांच्या या यशाचे श्रेय त्या त्यांच्या कुटुंबियांना देतात.

पूनम गौतम यांची पहिल्या महिला उपजिल्हा दंडाधिकारी न्यायिक म्हणून कानपूर ग्रामीण भागातील सिकंदरा तहसीलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सध्या तहसील सिकंदरा येथील न्यायालयीन पदाचा पदभार स्वीकारला आहे. अशाप्रकारे सर्व संकटांना तोंड देत हिंमत न हारता त्यांनी आपले स्वप्न पूर्ण साकार केले आणि जनतेला चोख प्रत्युत्तर दिले. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page