मुंबईत चालत्या ट्रेनमधून महिला आणि बाळाचा तोल गेला, तितक्यात RPF जवान देवदूत बनून आला आणि त्यांचे प्राण वाचवले..

लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. कमी वेळात आणि कमी खर्चात प्रवास होत असल्याने लोकांना हा प्रवास करणे परवडते. यामुळे दररोज मोठ्या प्रमाणत गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळते.

परंतु तुम्ही अनेकदा ट्रेनमधून व्यक्ती खाली पडल्याच्या घटना वाचल्या किंवा पाहिल्या असतील. यामध्ये अनेकांनी आपले जीव देखील ग’मा’व’ले आहेत. नुकतीच एक घटना समोर आली आहे. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द रेल्वे स्थानकामध्ये एक महिला आपल्या मुलाला घेऊन ट्रेनमध्ये चढत होती. ट्रेन मध्ये भरपूर गर्दी असल्याने ह्या महिलेला चढणे कठीण झाले होते. कसेतरी ही महिला आपल्या मुलाला घेऊन ट्रेन मध्ये चढली परंतु अचानक त्यांचा तोल गेला आणि तितक्यात ट्रेन सुरु झाली.

यादरम्यान स्थानकावर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवान अक्षय सोये ह्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्वरित प्रसंगावधान दाखवत या दोघांचे प्राण वाचवले. या घटनेमुळे महिलेच्या आणि मुलाच्या जीवावर बेतले असते. मात्र वेळीच जवानांच्या सतर्कतेमुळे आई आणि मुलाचे प्राण वाचले.

काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कै’द झाली आहे. आरपीएफ जवान अक्षय सोये यांनी दाखवलेल्या धाडसामुळे दोघांचे प्राण वाचवले, त्यामुळे त्यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील तुफान व्हायरल होताना दिसत आहे आणि प्रसंगावधान साधत आरपीएफ जवानाने केलेल्या धाडसाचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page