ऐकावे ते नवलंच! पुण्यातील या ऑटोरिक्षाचालकाने 3 किमीसाठी तब्बल 3100 रुपये भाडे आकारले..

तुम्ही अनेकदा रिक्षाने प्रवास केला असेल. प्रवास केल्यावर तुम्ही जास्तीत जास्त लांबच्या प्रवासाला 500 ते 1000 रुपये भाडे दिले असेल. पण पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्ही देखील चकित व्हाल.

बंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशाला ऑटोरिक्षा चालकाने लु’ट’ल्या’ची घटना कात्रज परिसरात घडली आहे. सातारा रस्त्यावरील पद्मावती ते कात्रज या अवघ्या तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी रिक्षाचालकाने तब्बल 3,100 रुपये भाडे आकारले.

विशेष म्हणजे या प्रवाशाकडे पुरेसे पैसे नव्हते. आ’रो’पी’ने प्रवाशाकडून 1,600 रुपये घेतले आणि उरलेले पैसे ‘मनी ट्रान्सफर’ दुकानातून द्या असे सांगून पैसे घेतले. या रिक्षाचालकाचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे.

पैसे ट्रान्सफर करणारे व्यावसायिक बजरंग निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या दुकानासमोर रिक्षा थांबली. त्यातून दोन जण बाहेर पडले आणि दुकानात आले. प्रवाशाने गुगल पेद्वारे निंबाळकर यांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये ट्रान्सफर केले. त्याबदल्यात निंबाळकर यांनी रोख रक्कम दिली. ही रक्कम घेऊन रिक्षाचालक निघून गेला, मात्र प्रवाशी दुकानात थांबले.

रिक्षाचालक निघून गेल्यानंतर प्रवाशाने त्याला फ’स’व’णु’की’ची माहिती दिली. हा प्रवासी पद्मावती येथे रिक्षात चढला. बंगळुरूला जायचे आहे, असे रिक्षाचालकाला सांगितल्यानंतर या रिक्षाचालकाने त्याला कात्रज दत्तनगर येथे नेले.

त्यावेळी रिक्षाचालकाचा साथीदारही रिक्षात होता. हे भाडे तीन हजार शंभर रुपये असल्याचे प्रवाशाकडून सांगण्यात आले. त्याच्याकडून एक हजार सहाशे रुपये काढून आ’रो’पीं’नी त्याला निंबाळकर यांच्या दुकानात नेले. उर्वरित पैसे जमा करून दोघेही पळून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page