हे आहे भारतातील सगळ्यात लहान नाव असलेले रेल्वे स्थानक, ज्याचे नाव सुरू होताच संपते..

रेल्वे ही सगळ्यांसाठीच खुप महत्वाचे साधन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बहुतांश लोक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. रेल्वे प्रवास हा सगळ्यांना परवडणारा आहे. अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रवास होत असल्यामुळे रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. भारतीय रेल्वे ही जगातील इतर रेल्वे सेवांपैकी सगळ्यात मोठी रेल्वे सेवा आहे.

भारतात मध्ये अनेक रेल्वे स्थानक आहेत. त्यांची नावे देखील खूप वेगळवेगळी आणि मजेशीर आहेत. काही रेल्वे स्थानकांची नावे फार मोठी आहेत तर काहींची अगदी छोटी. सगळ्यात लहान नाव असणारे रेल्वे स्थानक तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया भारतातील सगळ्यात लहान रेल्वे स्थानकाचे नाव, ज्याचे नाव सुरू होताच संपते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रेल्वे मार्गांचा विकास देखील झपाट्याने झाला. प्रत्येक रेल्वे स्थानकाचा काहीतरी इतिहास आहेच आणि त्यावरूनच रेल्वे स्थानकाला नाव देण्यात आलेले असते.

भारतातील सगळ्यात लहान रेल्वे स्थानक ओडिशा मध्ये आहे. याचे नाव केवळ दोन अक्षरी आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव ‘इब’ असे आहे. हे नाव सुरू होताच लगेच संपते. भारतीय रेल्वे मधील हे सगळ्यात लहान नाव असलेले एकमेव रेल्वे स्थानक आहे. या ‘इब’ रेल्वे स्थानकाचे नाव ओडिशा मधील महानदीची उपनदी असलेल्या ‘इब’ या नदीवरून पडले आहे, असे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page