महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने बनवले चालते फिरते मंगलकार्यालय! आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत भेटण्याची इच्छा केली व्यक्त..

तुम्ही कधी चालतं फिरतं मंगलकार्यालय पाहिलंय का? वाचून आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरं आहे. सध्या महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या तुफान चर्चेचा विषय ठरला आहे. आनंद महिंद्रा यांची महिंद्रा आणि महिंद्रा ही नमाकिंत वाहन कंपनी आहे.

आनंद महिंद्रा हे नेहमीच सो’श’ल मी’डि’या’व’र काहीना काही शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला असून तो व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असून या व्हिडिओ मध्ये दाखवले गेलेले वाहन 40 फूट लांब शिपिंग कंटेनर आहे.

ज्यात फोल्डेबल डिझाईनसचे भाग तयार केले आहेत. जे उघडल्यानंतर लग्नासाठी एक मोठा हॉल तयार होतो. हा 1200 चौरस फुटांचा असून या हॉलमध्ये जवळपास 200 लोकांची सहज व्यवस्था होऊ शकते. हा ट्रक लग्नसमारंभ तसेच इतर अनेक कार्यक्रमांसाठी वापरला जात आहे, असे तेथील गावकऱ्यांनी सांगितले आहे. पावासाळ्यात केल्या जाणाऱ्या लग्नांसाठी देखील हे मंगल कार्यालय खूप फायदेशीर आहे.

अशा प्रकारचे मंगल कार्यालय गावोगावी असणे खूप फायेशीर आहे. तसेच त्यापासून पर्यावरणाला कोणतीही हानी नाही. भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात कमी जागा घेणारे असे हे मंगल कार्यालय असणे गरजेचे आहे, असे आनंद महिंद्रा म्हणतात.

हा अनोखा कंटेनर महाराष्ट्रातील असून दरेकर इव्हेंट या कंपनीच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून त्यांनी या अनोख्या ट्रकची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीची भेट घेण्यास ते आतुर आहेत असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page