हिंगोलीच्या शेतकरी पुत्राची कमाल, अमेरिकेच्या एमआयटीमध्ये संपुर्ण जगभरातून 40 विद्यार्थ्यांमध्ये झाली निवड..

प्रत्येकाला आयुष्यात संघर्ष हा करावाच लागतो. यश मिळवायचे असेल तर आपल्याकडे काम करण्याची जिद्द असायला हवी. कठोर परिश्रम आणि मेहनत करूनच आपण यश संपादन करू शकतो. आज आपण अशाच एका शेतकरी मुलाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने जिद्दीने सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. हिंगोली मधील कहाकर या छोट्याशा गावचा रहिवासी असलेला आकाश पोपळघटे हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आकाशचे वडील गजानन पोपळघटे हे शेतकरी आहेत आणि आई लक्ष्मी पोपळघटे या गृहिणी आहेत.

आकाशने आपले चौथीपर्यंतचे शिक्षण कहाकर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण केले त्यांनतर रिसोड मध्ये राहिलेले शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने राजस्थानमधील कोटा येथे पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने त्याचे शिक्षण कोटा मधून पूर्ण केले.

कोटामध्ये आल्यावर त्याच्या ज्ञानात आणखी भर पडली. येथे त्याला अभ्यासासाठी अनेक रस्ते खुले झाले. त्याला अनेक स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. ओलंपियाड, जीईई मेन्स, ऍडव्हान्स यांसारख्या स्पर्धा परिक्षेची त्याने तयारी करण्यास सुरुवात केली.

जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाची मानली जाणारी मॅसुचुसेस्टस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या विद्यापिठात आपण अर्ज करू शकतो हे आकाशला समजले. संपूर्ण जगातून दरवर्षी या विद्यापीठात केवळ 40 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो.

येथे प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने त्याने रोज 18-18 तास अभ्यास केला आणि अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आले. एमआयटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परिक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि तो एमआयटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असल्याचे त्याला पत्र आले.

आकाशने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे कुटंबीय खूप आनंदात आहेत. शेतकऱ्याचा मुलगा असूनही त्याने सातासमुद्रापार आपला डंका वाजवला आहे. याबद्दल त्याचे ठिकठिकाणी सत्कार होत आहेत. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील त्याच्या या यशाचे कौतुक केले जात आहे.

तसेच त्याचे अभिनंदन करून त्याला पुढील भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. शेतकरी कुटंबातील या मुलाला सातासमुद्रापार जाण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी काही पतसंस्था व इतर लोकांनी आकाशला मदतीचा हात पुढे केला आहे, ज्यामुळे त्याचे भविष्य उज्ज्वल होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page