शेतकऱ्याचा नाद नाही करायचा! 50 गुंठ्यांत घेतले तब्बल 120 टन ऊसाचे उत्पादन..

भारत देश हा कृषिप्रधान देश मानला जातो. येथील जास्तीत जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेती हा असा व्यवसाय आहे ज्यात आपण कष्ट करून अमाप नफा मिळवू शकतो. अगदी शेतीचा एक तुकडा जरी असला तरीही, त्यातून शेतकरी नफा कमावू शकतो. आज आपण अशाच एका कष्टकरी शेतकऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने 50 गुंठ्यांत तब्बल 120 टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महळूंगे पडवळ या गावातील शेतकरी राजेंद्र आवटे यांनी 50 गुंठ्यांत 120 टन ऊसाचे उत्पादन घेऊन अनेक शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यांनी आपल्या जमिनीमध्ये खत व्यवस्थापनाच्या जोरावर केवळ 50 गुंठ्यांत 86032 जातीच्या ऊसाचे तब्बल 120 मेट्रिक टन एवढे भरघोस उत्पादन मिळवले आहे.

राजेंद्र आवटे यांनी ऊस उत्पादनाचे उत्तमप्रकारे व्यवस्थापन केले आहे. त्यांनी ऊस लागवडीनंतर 15 दिवसांची लायकोसिन, युरिया, उकिली ही औषधे वापरून आळवणी केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा 20 दिवसांनी बडसुटर, युरिया या औषधांची आळवणी केली होती. यामुळे राजेंद्र यांना एका खुटातून 8 ते 12 फुटवे निघाले होते.

राजेंद्र यांनी ऊस उत्पादनासाठी जैविक खतांचा वापर केला होता. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत दिल्या जाणारे अ‍ॅझोफॉसफो, अ‍ॅसिटोबॅकर यांसारख्या जैविक खतांचा वापर करून त्यांनी उसाचे उत्पादन घेतले. तसेच त्यांनी मल्टिमायक्रो व मल्टिमॅक्रो अशी फवारणी केली त्यामुळे ऊसाच्या उत्पादनात झपाट्याने वाढ झाली आणि यातून त्यांना भरघोस उत्पादन तर मिळालेच त्याचबरोरीने त्यांना चांगला नफा देखील मिळला आहे.

राजेंद्र यांनी यशस्वीरित्या केवळ 50 गुंठा जमिनीमध्ये तब्बल 120 टन उसाचे उत्पादन घेऊन अनेकांना चांगली प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या घवघवीत यशाचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page