कौतुकास्पद कामगिरी! या गावात ग्रामपंचायतच गावकऱ्यांना आंघोळीसाठी देते गरम पाणी, तेही विनाशुल्क..

सध्या सगळीकडे थंडीची चाहूल लागली आहे. थंडीच्या दिवसांत लोक गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी लागणारे ज’ळ’ण म्हणून जंगलात वृ’क्ष’तो’ड करत असतात. त्यामुळे पर्यावरणास हानी पोहचते. ही हानी रोखण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार कोहळी गावाने एक नवीन उपक्रम राबविला आहे.

राज्य सरकारकडून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी या गावाने राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले होते आणि स्मारक ग्राम याेजनेचे बक्षीस देखील मिळवले होते.

तसेच अनेक लहान माेठे पुरस्कार सुद्धा या गावाने पटकाविले आहेत. त्यांनतर या गावाने आणखी एक उत्तम उपक्रम राबविला आहे. या गावाने पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम भाऊबीजेपासून अविरतपणे सुरू आहे. या गावात 120 कुटुंबे राहतात.

पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असलेल्या तब्बल 100 एकर परिसरात झाडांची लागवड केली आहे. हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी वृ’क्ष’तो’ड केली जाऊ नये म्हणून आता ग्रामपंचयतीने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमाअंतर्गत रेंगेपार कोहळी गावातील लोकांना सकाळी 6 वाजल्यापासून मोफत गरम पाणी पुरवले जाते. या गावचे सरपंच मनोहर बोरकर यांनी गावात सोलर वॉटर हिटर यंत्र लावले आहे. तसेच दीड हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. अशा प्रकारे सोलर पॅनलद्वारे पाणी गरम होऊन सकाळी 6 ते 10 असे चार तास गावातील 120 कुटुंबाना पुरवले जाते.

कौतुकाची बाब म्हणजे यासाठी गावकऱ्यांकडून कोणताही मोबदला घेतला जात नाही. हा सर्व खर्च गृहकर आणि पाणीपट्टी करातून भागविला जातो. या मागचा प्रमुख हेतू म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण राखता येईल. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page