रिक्षाची एसटीला धडक लागल्याने एसटी चालकाचा ताबा सुटला, एसटी धरणात कोसळणार तेवढ्यात..

म्हणतात काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असाच काहीसा प्रकार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात घडला. लांज्याहून वडगावला जाणाऱ्या एसटी बसचा ‘बेनी’ धरणाजवळ अ’प’घा’त झाला. परंतु दैव बलवत्तर म्हणून एसटी बस तिथे असलेल्या एका झाडाला जावून धडकली आणि यामुळे धरणाच्या पाण्यात गेली नाही. यामुळे एसटीमधील मुले आणि प्रवासी सुदैवाने वाचले.

घटनेवेळी एसटी बसची धडक एका रिक्षाला लागल्याने रिक्षाचालक जखमी झाला आहे. ही सर्व घटना सोमवारी दुपारनंतर घडली असल्याची माहिती समोर आलेली आहे. ’15 ऑगस्ट’ स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन झाल्यानंतर जवळजवळ 25 ते 30 विद्यार्थी लांजा बस स्थानकातून दुपारी 1 वाजता ह्या एसटी बसने निघाले होते.

विद्यार्थ्यांसोबत काही अन्य प्रवासीही बसमध्ये होते. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास बेनी धरणाजवळ या बसची रिक्षाला धडक लागली आणि त्यामुळे एसटी बस चालकाचा बसवरील ताबा सुटला. धडक झाल्यानंतर एसटी शेजारीच असलेल्या झाडाला जावून धडकली आणि तिथेच अडकून थांबली.

जर बस त्या झाडाला धडकुन थांबली नसती तर थेट ती धरणाच्या पाण्यात कोसळली असती व मोठी दु’र्घ’ट’ना घडली असती. सुदैवाने एसटीमध्ये असलेले सर्व प्रवासी सुखरूप बचावले. एसटी थांबल्यानंतर सर्व विद्यार्थी व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page