मुंबईतील एका निवासी इमारतीत लिफ्टमध्ये अडकून एका वृद्ध महिलेचा मृ’त्यू, मुलगा वाचवण्यासाठी धावला पण..

सध्या लिफ्टमध्ये अडकून मृ’त्यू होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईमधील दोन जणांनी लिफ्टमुळे आपला जीव ग’मा’व’ल्या’च्या घटना समोर आल्या होत्या. अशातच नुकतीच लिफ्ट मध्ये पडून मृ’त्यू झाल्याची घटना मुंबईमधून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमधील कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरातील हायलँड ब्रिज या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर राहत असलेल्या 62 वर्षीय वृद्ध महिला नगीना अशोक मिश्रा या 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या.

नगीना मिश्रा या चौथ्या मजल्यावरून लिफ्टमधून खाली जात असताना लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्येच अडकली. यामुळे नागीना यांनी त्यांच्या मुलाला आवाज दिला. आईची हाक ऐकून त्यांचा मुलगा घराबाहेर पळत पळत आला. त्यानंतर मुलाने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याला लिफ्टचा दरवाजा उघडला नाही. म्हणून त्याने पटकन इमारतीच्या गेटवरील सिक्युरिटी गार्डला बोलावले. मात्र त्याला देखील लिफ्टचा दरवाजा उघडता आला नाही आणि त्याचदरम्यान वीजपुरवठा खंडित झाला आणि लिफ्ट अति वेगाने थेट तळमजल्यावर जाऊन आदळली. अचानक लिफ्ट खाली आदळल्यामुळे तळ भागाला मोठे छिद्र पडले.

या दु’र्दै’वी घटनेत नागीना यांना गंभीर दुखापत झाली. त्यांनतर त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृ’त घोषित केले. त्यांच्या या आकस्मित नि’ध’ना’मु’ळे त्यांच्या कुटुंबावर शो’क’क’ळा पसरली आहे.

या प्रकरणाचा चारकोप पोलीस स्टेशन मध्ये गु’न्हा दाखल केला असून या संदर्भात अधिक तपास करत आहे, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page