विद्यार्थ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी या उद्योजकाने शाळेला 3 गुंठे जागा दान केली..

आजकाल जमिनीवरून घरात सख्ख्या भावांमध्ये भांडण होताना आपल्याला पाहायला मिळतात. एवढेच नव्हे तर ते एकमेकांचा जीव घेण्यासाठी ही मागे पुढे बघत नाहीत. अशातच नुकतीच एक घटना समोर आली आहे. ज्यात एका व्यक्तीने आपली 3 गुंठा जमीन शाळेसाठी दान दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होती. ती जागा खासगी मालमत्तेच्या आवारात येत होती. त्यामुळे जिल्हा परिषदेने दिलेल्या पर्यायी जागेत वर्ग, इमारत, स्वच्छतागृहे इत्यादी एकत्रित असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठीचे होणारे हाल थांबविण्यासाठी एक प्रसिद्ध नर्सरी उद्योजक विद्यार्थ्यांसाठी धावून आले आहेत.

हवेली तालुक्यातील नर्सरी उद्योगात प्रसिध्द असणारे बालाजी नर्सरी उद्योगाचे अध्यक्ष संतोष शितोळे तसेच त्यांचे वडील सोपान शितोळे यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगतची असलेली स्व:ताच्या मालकीची 3 गुंठे जमीन सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी दान स्वरूपात जिल्हा परिषद शाळा बांधण्यासाठी शासनाला दिली आहे.

संतोष शितोळे यांच्या या निर्णयामुळे जिल्हा प्राथमिक शाळेचा अनेक वर्ष चालू असलेला जागेचा प्रश्न सुटला आहे. शितोळे कुटुंब हे सांप्रदायिक क्षेत्रातील आहेत. हे कुटुंब नेहमी समजसेवा करण्यात अग्रेसर असते.

यापूर्वी देखील शितोळे कुटुंबाने दिड गुंठे स्वतःच्या मालकीची जमीन मारुती मंदिरासाठी दान स्वरूपात दिली होती. तसेच आता देखील कोरेगाव मूळ ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.

अशी केवळ विनंती केली असता शितोळे कुटुंबांनी गोरगरीब मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी त्वरित निर्णय घेतला आणि शाळेसाठी जागा बक्षीसपत्राने देऊ केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल ग्रामस्थांनी त्यांचे खूप कौतुक केले आहे. तसेच सो’श’ल मी’डि’या’व’र देखील त्यांच्या या कार्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page