फिलिपिन्सची मुलगी होणार आता सुरतची सुन! 10वी पास मुलाशी लग्न करण्यासाठी मुलगी थेट फिलिपिन्स वरून आली भारतात..

प्रेम कधी, कुठे, कसे होईल हे सांगता येत नाही. प्रेम कोणतीही जात, रंगरूप तसेच कोणताही देश पाहून होत नाही. आपण सो’श’ल मी’डि’या’व’र नेहमीच प्रेमाचे भन्नाट किस्से पाहत असतो. अशीच एक घटना गुजरातमधील सुरत येथून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहावी पास असलेला सुरतमधील पान दुकान चालवणारा कल्पेश भाई मावजीभाई कच्छडिया हा दि’व्यां’ग आहे. 43 वर्षीय कल्पेश ह्याला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे.

कल्पेशच्या कुटुंबातील सगळे विवाहित आहेत. परंतु, कल्पेश दि’व्यां’ग असल्याने त्याने लग्न केले नाही. त्याचे आपले पान दुकान चालवणे हा रोजचा दिनक्रम असायचा. असे चालू असताना 2017 मध्ये त्याला फे’स’बु’क’वर रेबेका या 42 वर्षीय महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. रेबेका ही फिलिपिन्सची राहणारी आहे.

कल्पेशने रेबेकाची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. त्यांनतर रेबेका कल्पेशला इंग्रजी मधून मेसेजेस करायची. परंतु, कल्पेशला इंग्रजी येत नसल्याने तो आपल्या मित्रांना विचारून रेबेकाला रिप्लाय द्यायचा.

रेबेका शारीरिकदृष्ट्या अ’पं’ग आहे. तसेच तिच्या पतीचे नि’ध’न झाले आहे आणि ती आता एकटी राहत असल्याचेही रेबेकाने कल्पेशला सांगितले होते. पुढे हळुहळू त्यांच्यातला संवाद वाढत गेला आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघे गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत.

त्यानंतर दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे ठरवले. यासाठी रेबेकानेही 2020 मध्ये भारतात येण्याचे निश्चित देखील केले होते. तिने भारतात येण्यासाठी तिकीटही बुक केले होते. मात्र, त्यादरम्यान 24 मार्च 2020 रोजी देशात नि’र्बं’ध लावण्यात आले. त्यामुळे ती भारतात येऊ शकली नाही.

त्यांनतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात राहिले आणि आता ऑक्टोबर 2022 मध्ये तिने भारतात जाऊन कल्पेश सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर रेबेका फिलिपिन्स वरून दिवाळी दिवशी भारतात आली. दोघेही एकमेकांना समोरासमोर भेटून खूप झाले होते. ते दोघेही खूप आनंदात होते. रेबेका आल्यानंतर कल्पेशने तिची घरातील सगळ्यांशी ओळखही करून दिली. यावर घरच्यांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिला.

घरच्यांनी ही लग्नाला होकर दिल्याने ते दोघे ही खुप खुश आहेत. आता हे दोघेही भारतीय पद्धतीनुसार 20 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र या दोघांच्या ही अनोख्या प्रेमाची गोष्ट चांगलीच धुमाकुळ घालत आहे. अनेक लोक त्यांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page