वि’ध’वा सुनेला आपली मुलगी मानून सासु-सासऱ्यांनी मुलाच्या नि’ध’ना’नंतर सुनेचे दुसरे लग्न लावून दिले..

राजकोट मधील गांधीग्राम येथील धीरूभाई जाधवभाई जेठवा हे अक्षरनगर येथे राहतात. ते मोचीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांचा मुलगा मुकेशभाई हा एका कारखान्यात नोकरी करत होता. 10 वर्षांपूर्वी मुकेशभाई यांचे महाराष्ट्रातील मोची कुटुंबातील जया यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत.

परंतु 2020 मध्ये मुकेशभाई यांच्यावर काळाने घा’ला घातला. त्यांचे अचानक हृ’दय’वि’का’रा’च्या झटक्याने नि’ध’न झाले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पतीच्या नि’ध’ना’नंतर जया यांना आपले आयुष्यच संपल्या सारखे वाटू लागले. त्या पुर्णपणे खचून गेल्या होत्या. त्यांची अशी अवस्था पाहून त्यांच्या सासु सासऱ्यांनी जया यांचे दुसरे लग्न लावून देण्याचे ठरवले.

ते त्यांच्या सुनेसाठी एक चांगले कुटूंब शोधू लागले. यादरम्यान त्यांची अहमदाबाद येथे राहणारे परेशभाई मगनभाऊ वाधेर यांच्याशी ओळख झाली. हे शिवणकाम म्हणून काम करत असत. मुलगा चांगला असल्याने सासु सासऱ्यांनी सुनेचे या मुलाशी लग्न लावण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही नातेवाईकांमध्ये या विवाहाबद्दल बोलणी झाली. जया यांना आईवडील नव्हते. समाजातील अनेक लोकांनी याला विरोध दर्शवला. मात्र आम्ही आमच्या सुनेला कधी सूनेसारखी वागणूक दिली नाही.

आम्ही नेहमीच तिला आमची मुलगी मानली. तिला देखील आईवडील नसल्याने तिनेही आम्हाला तिचे आईवडीलच मानले होते. आपण आपल्या सुनेला आपली मुलगी मानावे असा लाखमोलाचा संदेश देत त्यांनी आपल्या सुनेचे लग्न लावून दिले.

सध्या ते दोघे ही आनंदाने जीवन जगत आहेत. सासु सासरे ही हे पाहून खुश आहेत. आपल्या सुनेला आपली मुलगी मानत असा संदेश ते नेहमी लोकांना देत असतात. त्यांच्या या विचारसरणीचे अनेकांनी कौतुक देखील केले. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील त्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे. अनेकांसाठी हे एक आदर्श उदाहरण आहे. त्यांनी लोकांपुढे एक चांगला आदर्श समोर ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page