वडिलांच्या निष्काळजीपणामुळे 11 महिन्यांच्या चिमुकलीचा जी’व गे’ला, हसत्या-खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला..

लहान मुलांना सांभाळणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे सर्वात अवघड काम आहे. कारण कधी कधी आपले लक्ष नसले तर मुले न सांगता दुसरीकडे जातात किंवा अनेकदा पालकांच्या निष्काळजीपणामुळे अ’प’घा’त घडतात. अशीच एक घटना हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातून समोर आली होती.

जिंद जिल्ह्यातील कर्मचारी कॉलनीत राहणारे विक्रम त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलीला त्यांच्या बाथरूममध्ये अंघोळ घालत होते. विक्रम यांनी त्यांच्या मुलीला टबमध्ये ठेवले. मुलीला अंघोळ घालणार तोपर्यंत त्यांना फोनवर कॉल आला.

फोनवर बोलण्यासाठी त्यांनी मुलीला टबमध्येच ठेवले आणि ते मोबाईल घेऊन बाहेर निघून गेले. विक्रम फोनवर बोलत असताना त्यांचा 4 वर्षांचा मुलगा बाथरूममध्ये गेला आणि त्याने नकळत पाण्याचा नळ चालू केला.

नळ चालूच ठेवून मुलगा निघून गेला आणि त्यामुळे टबमध्ये भरपूर पाणी साचले. टबमध्ये जास्त पाणी झाल्याने 11 महिन्यांच्या चिमुकलीचा बु’डू’न मृ’त्यू झाला. काही मिनिटांत जेव्हा मुलीची आई रेखा बाथरूममध्ये गेल्या तेव्हा त्यांचे लक्ष टबकडे गेले आणि त्यांनी आपल्या मुलीला पाहिले.

मुलीच्या आईने मुलीला बाहेर काढले आणि दोघांनी त्वरित मुलीला दवाखान्यात नेले. परंतु तोपर्यंत भरपूर उशीर झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी मुलीला मृ’त घोषित केले. वडील सारखे स्वतःला दोष देत मुलीच्या आठवणीत रडत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page