या 3 बहिणी चालवत आहेत परंपरागत खानावळ, केवळ 80 रुपयात मिळते भरपेट जेवण..

अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अन्नदान केल्याने आपल्या पुण्यात भर पडते असे म्हणतात. आपण अनेक ठिकाणी पाहत असतो की, अगदी कमी पैशात आपल्याला भरपेट जेवण मिळते, ज्यासाठी महागड्या हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट मध्ये बक्कळ पैसे खर्च होतात. आज आपण अशीच एक गुजरात मधील तीन बहिणींची गोष्ट पाहणार आहोत, जी सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान चर्चेचा विषय ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात मध्ये राहणाऱ्या साधारणतः 15 ते 20 या वयोगटातील असणाऱ्या तीन बहिणी परंपरागत असलेला गुरुकृपा या नावाने असलेला खानवळीचा व्यवसाय चालवत आहेत. हा व्यवसाय त्यांच्या आजोबांनी सुरू केला होता. आजोबांनंतर हा व्यवसाय या मुलींचे वडील सांभाळू लागले आणि आता या तिघी बहिणी हा व्यवसाय अगदी चोखपणे संभाळत आहेत. तिघींनी देखील थोडी थोडी कामे वाटून घेतली आहेत.

यामुळे त्यांना खानावळ सांभाळणे अवघड जात नाही. यांच्याकडे केवळ 80 रुपयांमध्ये अनलिमिटेड जेवण मिळते. या त्यांच्या गुजराती थाळी मध्ये वरण-भात, पोळ्या, 2 प्रकारच्या भाज्या, पापड-लोणचं सलाड तसेच ताक अशा प्रकारे सगळ साग्रसंगीत भरपेट जेवण मिळते.

एवढ्या लहान वयात त्यांचा परंपरागत असलेला खानावळीचा व्यवसाय त्या अगदी उत्तमरीत्या संभाळत आहेत. परिसरातील लोक देखील त्यांचे भरभरून कौतुक करतात. या तिघी बहिणींचा व्हिडिओ सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र ही धुमाकुळ घालत आहे. या तिघी बहिणी करत असलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page