देशाचे सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार..

देशाचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत मोलाचे योगदान देणारे उद्योगपती रतन टाटा यांचे आयुष्य आता लवकरच चित्रपटातून सर्वांसमोर येणार आहे. रतन टाटा हे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत. त्यांची उदारता, त्यांच्या कर्मचाऱ्यांशी असलेली त्यांची वागणूक तसेच त्यांचे प्राण्यांवरचे प्रेम यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

आता रतन टाटा यांच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण राष्ट्रीय पुरस्कार विजेती दिग्दर्शक सुधा कोंगरा करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या चित्रपटाद्वारे रतन टाटा यांच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी ज्या अनेकांना माहितही नसतील अशा गोष्टी यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सुधा यांनी सांगितले आहे. या चित्रपटासाठी अनेक दिवस रिसर्च केला गेला आणि अखेर हे काम संपले असल्याची माहिती दिली आहे.

रतन टाटा यांच्या सारख्या उत्कृष्ट अशा व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट दिग्दर्शित करणे हे माझे स्वप्न होते आणि ते आता लवकरच सत्यात उतरणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुधा कोंगरा या खूप उत्साहीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रतन टाटांबद्दल माहिती नसलेल्या अनेक खास गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातुन लोकांपर्यंत पोहचल्या जातील असा प्रयत्न असल्याचे सुधा यांनी सांगितले आहे. या चित्रपटावर काम सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असलेले पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page