हिवाळ्यात उकडलेली अंडी खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे..

आपले आरोग्य चांगले राहावे आपण नेहमी निरोगी राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. उत्तम आरोग्य राखणे हे आपल्याच हाती असते. अंडी खाण्याचे खूप आरोग्यदायी फायदे आहेत. अंड्यांमध्ये नऊ अत्यावश्यक अमीनो अ‍ॅसिड्स असतात. ते आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण करत असतात. अंड्यांमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात, परंतु आपल्याला आरोग्य वाढविण्यासाठी आपण त्याचा कसा वापर करतो यावर ते अवलंबून असते.

अंड्यांचे सेवन करण्याचे विविध प्रकार आहेत. परंतु, त्यात उकडलेल्या अंड्यांचे फायदे हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात. उकडलेले अंडे हे शरीरासाठी भरपूर पोषक असते. ते चवदार असते आणि त्याचबरोबर ते कोणत्याही वयात आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते.

आपण उकडलेल्या अंड्याचे आरोग्यासाठीचे काही फायदे पाहणार आहोत ते खालीलप्रमाणे आहेत: कोलेस्टेरॉल कमी होते- आपण जेव्हा अंडे उकडतो तेव्हा त्या अंड्याचा पांढरा भाग असतो त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. अंडे उकडल्यानंतर त्यामधील पिवळा भाग बाजूला काढून फक्त पांढऱ्या भागाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रालची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

वजन कमी होते- उकडलेले अंडे हे प्रथिनांचा उत्कृष्ट असा स्रोत आहे. त्यामुळे याचा फायदा आपल्याला वजन कमी करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतो. चयापचय वाढवते- प्रथिनेयुक्त आहार घेतल्याने चयापचय क्रिया वाढू शकते. शरीरातील पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी उकडलेले अंडी खाल्ल्याने जास्त कॅलरी बर्न करण्यास मदत होते. यामुळे चयापचय प्रक्रियेला चालना मिळते.

कोलीन- कोलिन हे एक पोषक घटक आहे जे उकडलेल्या अंड्याद्वारे मिळते ज्याची मेंदू, मज्जासंस्था, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधीत आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. हे घटक मेंदूच्या पेशींमधील पडद्याची रचना चांगली राखण्यास मदत करते, जे मेंदूतून मज्जातंतू आणि स्नायूंना संदेश पाठवत असतात. हे ग’र्भा’ती’ल मेंदूच्या विकासासाठी मदत करते त्यामुळे जन्मातील दोष टाळले जाऊ शकतात.

डोळे, केस आणि नखे यांचे आरोग्य चांगले राहते- उकडलेली अंडी ही डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. दररोज एक उकडलेले अंडे खाल्ल्यामुळे मॅक्युलर डीजेनेरेशन टाळता येऊ शकते कारण अंड्यामध्ये लुटेन आणि झेक्सॅन्थिन हे पोषक घटक असतात.

त्यामुळे उकडलेले अंडे खाल्ल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका कमी असतो. उकडलेल्या अंड्यात गंधकयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असतात. त्यात डी जीवनसत्व असते त्यामुळे केसांची चांगली निगा राखण्यास मदत होते तसेच नखे देखील वाढण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page