सोलापूरच्या या शेतकऱ्याने पेरूची लागवड करून केरळ राज्यात केली विक्री, सहा महिन्यांत झाला 14 लाख रुपयांचा नफा

शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणतात. इतरांची भूक भागवण्यासाठी स्वतःची भूक मारून शेतकरी शेतात काबाडकष्ट करत असतो. अनेक शेतकऱ्यांना मालाचा योग्य मोबदला मिळत नाही पण आता शेतकरी देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत असल्याने बाजारभाव त्यांना माहीत झाला आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत.

सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ नोगोबाचे या गावचे रहिवासी असलेले दत्तात्रय लबडे हे एक शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या दोन एकर शेतीमध्ये VNR या जातीच्या पेरुची लागवड केली आहे. यामधून त्यांना मागील सहा महिन्यांत 14 लाख रुपयांचा नफा झाला आहे.

त्यांच्या शेतातील पेरू हे केरळ बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत. केरळ बाजारात त्यांच्या पेरुला प्रती किलो 70/80 रूपये असा दर मिळत आहे. आतापर्यंत त्यांनी 24 टन पेरूची विक्री केली असून आणखी 4/5 टन उत्पादन मिळेल, असे दत्तात्रय लबडे यांनी सांगितले आहे. त्यांना यामधून भरपूर नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आपल्या शेतीमधून कोणत्या पिकाचे जास्त उत्पादन मिळेल याचे प्रत्येक शेतकऱ्याने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, असे दत्तात्रय यांचे मत आहे. दत्तात्रय लबडे यांनी यशस्वी रित्या शेती करून चांगला नफा मिळवला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page