लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनी तिचा नवरा तिला सोडून गेला, IAS अधिकारी होऊन सगळ्यांना दाखवून दिले..

सावरकुंडला या गावात कोमल गणात्रा यांचा जन्म झाला. कोमल यांचे वडील सुशिक्षित होते. त्यांनी नेहमीच मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न त्यांना त्यांच्या वडिलांनी दाखवले होते. कोमल यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावी, अशी त्यांची इच्छा होती.

जेमतेम चार वर्षांची असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेबद्दल सांगितले होते, असे कोमल यांनी सांगितले. त्यामुळे जेव्हा मी यूपीएससी परीक्षेचा विचार करायचे तेव्हा माझ्यासमोर वडिलांचे स्वप्न यायचे, असे त्या म्हणतात.

कोमल यांना नेहमीच स्वतंत्रपणे विचार करण्याचे आणि स्वतःची मते मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. स्वतंत्रपणे वागणे, बोलणे आणि विचार करणे ह्या गोष्टीमुळे कोमल यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता आली. त्यांनी संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी साहित्यात पदवी शिक्षण घेतले. त्यांना केलेची सुद्धा आवड होती त्यामुळे त्यातही त्यांनी विशारद पदवी मिळवली.

2008 मध्ये कोमल यूपीएससी परीक्षेची तयारी करत असतानाच त्यांचे लग्न झाले. न्यूझीलंडमधील एका NRI मुलासोबत त्यांचे लग्न ठरवण्यात आले. त्यांचे लग्न एका सुशिक्षित कुटुंबात झाले. परंतु असे असले तरी त्यांच्या सासरच्यांनी त्यांच्याकडे हुं’ड्या’ची मागणी केली.

कोमल यांनी या प्र’थे’ला विरोध केला तर त्यांना घर सोडण्यास सांगितले. लग्नानंतर 15 दिवसातच त्यांचा नवरा त्यांना सोडून न्यूझीलंडला निघून गेला तो परत कधीच आला नाही. यामुळे कोमल आणि त्यांचे कुटुंबिय उद्ध्वस्त झाले.

त्यावेळी कोमल यांना त्यांचे संपुर्ण आयुष्य संपल्यासारखे वाटत होते. परंतु, त्या पुढारलेल्या विचारसरणीच्या असल्यामुळे त्यांना नव्याने आयुष्याची जबाबदारी घेण्याचे बळ आले. त्यांनी घडलेल्या घटनेसाठी पोलिस आणि सरकारकडे मदत मागितली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरललाही त्यांचा नवरा शोधण्यासाठी पत्र लिहिले. तिथून देखील जास्त प्रतिसाद आला नाही. यामुळे सरकारी व्यवस्थेत आपणच बदल घडवून आणण्याची कोमल यांची जिद्द आता आणखी वाढली होती.

कोमल सांगतात, “मला समजले की मला सोडून गेलेल्या माणसाचा पाठलाग केल्याने माझीच मानसिक शांतता बिघडत आहे.” त्यामूळे त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दृढ निश्चय केला.

पुढे कोमल भावनगरमधील एका छोट्या गावात राहायला गेल्या आणि तिथे 5000 रुपये पगाराची सरकारी शिक्षिकेची नोकरी केली. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमुळे उदरनिर्वाहासाठी त्यांना त्या नोकरीची मदत झाली. मात्र, त्यांना सामाजिक बदल घडवण्याची इच्छा होती.

त्यांच्याकडे यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी कमी साधने उपलब्ध होते. ज्या गावात त्या शिकवत होत्या, त्या गावात इंटरनेट, इंग्रजी वर्तमानपत्र, लॅपटॉप ह्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. अशा बिकट परिस्थिती मध्ये असताना ही कोमल यांनी मोठ्या जिद्दीने तयारी करण्यास सुरुवात केली. त्यांचे परीक्षा केंद्र मुंबईत होते.

आपल्या राज्याबाहेर कधीही प्रवास न केलेल्या एका मुलीसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रवास करणे फारच अवघड होते. अशा प्रकारे सगळ्या परिस्थितीवर मात करून 2012 मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत 591 रँक मिळवला. त्या वर्षी तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करणार्‍या 11 उमेदवारांपैकी त्या एक होत्या.

कोमल आता संरक्षण मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून दिल्लीत कार्यरत आहेत. त्यांनी दुसरे लग्न केले आणि आता त्यांना तक्षवी नावाची गोंडस मुलगी आहे. आज त्यांच्याकडे सर्व काही आहे आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षांला त्या श्रेय देतात.

दरवर्षी UPSC परीक्षेची तयारी करणारे लाखो उमेदवार असतात ज्यांचा आपआपला संघर्ष असतो. पण काही प्रवास हे कोमल यांच्या सारखे कठीण आणि खडतर असतात. जो अनेकांसाठी एक प्रेरणादायी आहे. तसेच नशिबात बदल कसे घडवता येतात याचेही त्या एक उत्तम उदाहरण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page