कोल्हापूरच्या रिक्षाचालकाच्या मुलीचा अटकेपार झेंडा, अमेरिकेच्या कंपनीकडून मिळाले तब्बल 41 लाखांचे पॅकेज

स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आणि जिद्द असेल तर परिस्थिती कितीही वाईट असली तरी कोणतेही मोठे स्वप्न सहज पूर्ण करता येते. देशातील तसेच जगभरातील लोकांना मागील दोन वर्षांच्या काळात नोकरी आणि पगार कपातीचा सामना करावा लागत होता. या सगळ्यात महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या मुलीने घवघवीत यश मिळवले आहे.

अमृता कारंडे ही मराठी कुटुंबातील मुलगी आहे. त्यांचे वडील विजय हे ऑटोचालक आहेत तर आई गृहिणी आहे. अमृता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांना दहावीत 97 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग करण्याचा निर्णय घेतला.

अमृता यांनी कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेतला. त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत होत्या. तेव्हा त्यांना एका टॉप कंपनीकडून तब्बल 41 लाखांचे मोठे पॅकेज मिळाले.

त्यांना युनायटेड स्टेट्समधील मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या Adobe कडून प्री-प्लेसमेंटसाठी ऑफर लेटर मिळाले. कंपनीने त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर म्हणून नियुक्त केले. अभ्यास पूर्ण करण्यापूर्वीच मिळालेल्या या ऑफरमुळे त्यांचे कुटुंबीय खूप आनंदी झाले. अमृता यांना भारतात माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात संशोधन करायचे आहे. त्या दिशेने आता त्यांनी वाटचाल सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page