वयाच्या तिसऱ्या वर्षी हातात कॉम्पुटर घेतला, 11 व्या वर्षी स्वतःची कंपनी बनवली, ही आहे जगातील सर्वात तरुण सीईओ

आजकालची पिढी मोबाईल मधेच सतत गुरफटलेली आपण अनेकदा पाहतो. मैदानी खेळांपेक्षा ते मोबाईल वरील गे’म्स जास्त पसंत करतात. त्यांच्या वेगळ्या जगात ते हरवून गेलेले असतात. एकटे राहणे ही पिढी अधिक पसंत करते. अशातच एक चकित करणारे उदाहरण समोर आले आहे.

एका मुलीने अगदी लहान वयात मोठे यश संपादन केले आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील रहिवासी असलेली श्रीलक्ष्मी सुरेश मेनन हिचा जन्म 5 फेब्रुवारी 1998 रोजी झाला. तिचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे. तिचे वडिल सुरेश मेनन हे वकील होते तर आई विजू सुरेश मेनन या गृहिणी आहेत.

श्रीलक्ष्मी यांना लहानपणापासूनच कॉम्प्युटरमध्ये खूप रस होता. ती अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कॉम्प्युटरवर काम करत होती. तिच्या वडिलांनी दाखवलेल्या एका लहान मुलाने डिझाइन केलेल्या वेबसाइटने ती इतकी प्रभावित झाली की वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी तिने पहिली वेबसाइट तयार केली. तिने पाहिली वेबसाईट ही आपल्या शाळेची बनवली होती. जे काम युनिव्हर्सिटीमध्ये वर्षानुवर्षे मेहनत करूनही लोकांना करता येत नाही, ते काम 8 वर्षांच्या श्रीलक्ष्मीने केले आहे.

पुढे श्रीलक्ष्मीने स्वतःची वेब डिझाईन कंपनी सुरू केली. यानंतर वयाच्या केवळ 11 व्या वर्षी रेनबो टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि उद्योजक सैनुल अबेदिन यांच्यासमवेत ऑनलाइन पिक्सेल ट्रेडर्स नावाची दुसरी कंपनी देखील सुरू केली. या वयात मुलांना आई-वडिलांचे बोलणेही नीट समजत नाही. अशा वयात श्रीलक्ष्मीने जे करून दाखवले ते उल्लेखनीय आहे.

श्रीलक्ष्मी ही देशातच नाही तर जगात देखील प्रसिध्द झाली आहे. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी तिने 40 हून अधिक पुरस्कार मिळवले होते. यामध्ये 18 वर्षांखालील असोसिएशन ऑफ अमेरिकन वेबमास्टर्स चे सदस्यत्व तिला मिळाले. तसेच गोल्ड वेब अवॉर्ड देऊन देखील तिचा गौरव करण्यात आला होता.

भारत सरकारचा राष्ट्रीय बाल पुरस्कार देखील तिला बहाल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर एका मार्केटिंग कंपनी इन्फोग्रुपने श्रीलक्ष्मी हिला आपली ब्रँड ॲ्म्बेसेडर बनवले आहे. ती सध्या YGlobes च्या डायरेक्टर देखील आहे. जगातील सर्वात तरुण सीईओ बनण्याचा मानही तिने पटकावला आहे. श्रीलक्ष्मी हिची काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तरुण पिढीला नवीन ऊर्जा देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page