मजुराची मुलगी झाली त्यांच्या समाजातील पहिली IAS ऑफिसर, मित्रांनी वर्गणी गोळा करून पाठवले होते मुलाखतीला

एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द जर आपल्यात असेल तर कितीही साधनांची कमतरता असली तरी आपल्याला यश मिळतेच. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने, आपण प्रत्येक ध्येय साध्य करू शकतो. अशीच एक गोष्ट आज आपण पाहणार आहोत.

श्रीधन्या सुरेश ह्या मूळच्या केरळमधील वायनाड जिल्ह्यातील पोजुथाना या छोट्या गावातील रहिवासी आहेत. वायनाड हा केरळमधील सर्वात मागासलेला जिल्हा आहे. त्यांचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत.

त्यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडिल आणि त्यांचे तीन भावंडे असा परिवार आहे. श्रीधन्या यांचे वडील रोजंदारी मजूर होते. याशिवाय ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गावच्या बाजारात ध’नु’ष्य’बा’ण विकत असत. मूलभूत सुविधांअभावी श्रीधन्या आणि त्यांच्या भावंडांचे पालनपोषण झाले आहे.

श्रीधन्या यांनी आपले शालेय शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी सेंट जोसेफ कॉलेजमधून प्राणीशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्या कोझिकोडला गेल्या. तिकडे कालिकत विद्यापीठातून त्यांनी पीजी शिक्षण पूर्ण केले.

पुढे त्या सरकारी नोकरीच्या शोधात होत्या. काही काळानंतर त्यांची केरळमध्ये अ’नु’सू’चि’त जमाती विकास विभागात लिपिक म्हणून निवड झाली होती. त्यांना आ’दि’वा’सी समजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी UPSC परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

श्रीधन्या सुरेश या 2016 आणि 2017 मध्ये UPSC च्या परीक्षेला बसल्या होत्या, परंतु त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी त्यांनी परिक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी हे यश मिळवून संपूर्ण समाजाची मान उंचावली.

पुढे त्यांना मुलाखतीसाठी दिल्लीला जावे लागणार होते परंतु दिल्लीला जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. श्रीधन्या यांच्या मित्रांना हे कळताच त्यांनी एकत्र मिळून 40 हजार रुपयांची देणगी गोळा करून त्यांना दिली. यानंतर त्यांचा निकाल लागला आणि त्यातही त्या उत्तीर्ण झाल्या.

श्रीधन्या या अखेर 2018 मध्ये आयएएस अधिकारी बनल्या. आयएएस अधिकारी होणाऱ्या केरळमधील त्या पहिल्या आ’दि’वा’सी महिला आहेत. त्यांच्या या यशाचा मार्ग खूपच आव्हानात्मक होता. तरीही त्यांनी जिद्दीने हे यश संपादन केले आहे. खरोखरच आजच्या पिढीसाठी त्या आदर्श व्यक्तिमत्व आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page