नाशिकची कन्या गाजवतेय देशभरात नाव, 14 व्या वर्षी मिळवली 2 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट पदवी..

आजकालची तरुण पिढी नेहमी आपल्याला मोबाईल मध्येच व्यस्त असलेली पाहायला मिळते. ही पिढी स्वतःच्याच विश्वात हरवून गेलेली आपल्याला पाहायला मिळत असते. परंतु आज आपण अशा एका तरुणीची कहाणी जाणून घेणार आहोत, जिने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी नवा विक्रम केला आहे.

नाशिक मधील रहिवासी असलेली 14 वर्षीय गीत पटणी ही नाशिक जिल्ह्यातील एका कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. तिचे आईवडिल दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. यामुळे त्यांचे नेहमी निरोगी आरोग्य राहण्याकडे जास्त लक्ष असते. यातूनच गीतला देखील लहानपणापासूनच योगाची आवड निर्माण झाली.

आई-वडिलांकडून योगाचे धडे घेत तिने मागील दोन वर्षात ओढवलेल्या कठीण काळात स्वतःचा योगा क्लास चालू केला. याद्वारे ती अनेक लोकांना योगा शिकवून निरोगी राहण्यासाठी मदत करत असते. तिला तिच्या आई-वडिलांमुळे तिला योगाचे संपुर्ण ज्ञान अवगत आहे आणि या ज्ञानाच्या आधारावरच ती सगळ्यांना तंदुरुस्त राहण्याचे सल्ले देत असते.

मागील वर्षांच्या काळात असलेल्या कठीण प्रसंगामध्ये लहान मुले सतत मोबाईलच्या आ’हा’री गेलेले पाहायला मिळत होते आणि यामुळे त्यांच्या मानसिकतेवर तसेच शरीरावरही याचा विपरीत परिणाम होताना पाहायला मिळत होता. या गोष्टींवर उपाय म्हणून गीतने या विषयावर प्रबंध तयार केला आणि जगातील सात नामांकित विद्यापीठांकडे पाठवला. या सगळ्यात तिच्या आईवडिलांनी ही तिला चांगली साथ दिली, असे गीत म्हणते.

यामधून तिला आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असलेले कोलंबिया आणि घाणा या दोन विद्यापीठांनी गीतला डॉक्टरेट पदवी दिली. एकच वेळी दोन डॉक्टरेट पदवी मिळवणारी गीत ही देशातील पहिलीच तरुण मुलगी असल्याचे सांगितले जात आहे.

गीत अनेक पुरस्कारांची मानकरी देखील ठरलेली आहे. तिच्या कर्तृत्वामुळे तिच्या आईवडिलांना गीतचा सार्थ अभिमान वाटत आहे. लहान वयात मिळवलेल्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तिला तिच्या पुढील भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page