झोपडपट्टीमध्ये राहून शिक्षण पूर्ण केले, अनेक संकटांचा सामना करत IAS अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले..

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. पण अनेकजण त्यावर मात करून यशाचे शिखर गाठत असतात. आज आपण अशाच एका यशस्वी महिला आयएएस अधिकारी बद्दल जाणून घेणार आहोत. उम्मुल खेर या राजस्थान मधील पाली येथील मारवाडी कुटुंबातील आहेत. उम्मुल या लहानपणापासूनच दि’व्यां’ग होत्या. उम्मुल यांना आई-वडिल आणि तीन भाऊ-बहिण असा परिवार आहे.

उम्मुल आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीतील निझामुद्दीन येथील झोपडपट्टीमध्ये राहत होते. ते गाडीवर कपडे विकण्याचे काम करायचे. काही काळानंतर सरकारच्या आदेशानुसार त्यांची झोपडपट्टी तोडण्यात आली होती. यामुळे उम्मुल यांचे कुटुंब त्रिलोकपुरी येथील झोपडपट्टीमध्ये राहण्यासाठी गेले. पुढे उम्मुल या नववीत असताना त्यांच्या आईचे अकाली नि’ध’न झाले.

मुले लहान असल्यामुळे त्यांची जबाबदारी सांभाळण्यासाठी वडीलांनी दुसरे लग्न केले. परंतु उम्मुल यांनी शाळेत जाणे त्यांच्या सावत्र आईला आवडत नव्हते. सावत्र आई त्यांना शाळेत जाण्यापासून नेहमी रोखत असत. मात्र, उम्मुल यांना आपले शिक्षण थांबवायचे नव्हते. यामुळे त्यांनी एक आपले राहते घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या एकट्या एका झोपडपट्टीमध्ये राहू लागल्या. त्यांनी झोपडपट्टीमध्ये राहून आपले शिक्षण पूर्ण केले.

उम्मुल यांनी दहावीत 91 टक्के तर बारावीमध्ये 90 टक्के गुण प्राप्त केले. यासाठी त्यांनी अनेक कष्ट केले आणि मेहनत घेतली. उम्मुल यांना बोन फ्र’जा’ई’ल डि’स’ऑ’र्ड’र हा आजार आहे. यामुळे त्यांना 16 वेळा फ्रॅक्चर झाले असून 8 श’स्त्र’क्रि’या झाल्या आहेत. तरीही त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी आपली जिद्द सोडली नाही.

उम्मुल यांनी दिल्लीतील गार्गी महाविद्यालयातून मानसशास्त्रमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी जेएनयूमधून इंटरनॅशनल स्टडिजमधून एम.ए आणि एम फिल पूर्ण केले. पुढे त्यांची 2014 मध्ये जपानच्या इंटरनॅशनल लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी निवड करण्यात आली. 18 वर्षांच्या इतिहासात उम्मुल या एकमेव भारतीय होत्या ज्यांची यासाठी निवड करण्यात आली होती.

पुढे उम्मुल जेआरएफ उतीर्ण झाल्या. याचदरम्यान त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी युपीएससी परीक्षेसाठी खूप अभ्यास केला. दिवसरात्र मेहनत घेतली. त्यांच्यासमोर अनेक अडथळे आले मात्र, त्यांनी कधीही त्याची तमा बाळगली नाही.

2016 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. उम्मुल खेर यांच्या आयुष्यातील संघर्ष खूप मोठा होता. मात्र, त्यांनी जिद्द न सोडता आयएएस होऊन यशाला गवसणी घातली आहे. उम्मुल या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page