नाशिकच्या दाम्पत्याची प्रेरणादायी कहाणी! मू’कबधीर जोडप्याने अनेक संकटांचा सामना करून उभारले पाणीपुरी सेंटर

अनेक संकटे आली तरी त्या परिस्थितीला तोंड देत जिद्दीने आपले ध्येय गाठणारे अनेक लोक आहेत. आज आपण अशाच एका दि’व्यां’ग’त्वा’व’र मात करून जिद्दीने उभे राहणाऱ्या दाम्पत्याबद्दल जाणून घेणार आहोत. नाशिकचे रहिवासी असलेले किशोर कडेकर हे पत्नी मनीषा कडेकर आणि मुलगा अंकूश कडेकर यांच्यासमवेत नाशिकमध्येच राहतात.

किशोर कडेकर हे जन्मापासून मू’क’ब’धि’र आहेत. त्यांचे शिक्षण देखील याच माध्यमातून पूर्ण झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी परिसरात कपडे इस्त्रीचा व्यवसाय सुरु केला. यानंतर त्यांना मुंबई मध्ये दि’व्यां’ग शाळेत शिक्षकाची नोकरी लागली. यामुळे ते आपल्या कुटुंबासह मुंबई मध्ये येऊन स्थायिक झाले.

मुंबई मध्ये मिळालेल्या शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्तमरीत्या होत होता. मात्र, याचदरम्यान जागतिक सं’क’ट ओढवले आणि होत्याचे नव्हते झाले. किशोर यांना आपली नोकरी सोडून पुन्हा नाशिकमध्ये येऊन राहावे लागले. नोकरी गेल्यानंतर त्यांच्या संसाराचा गाडा कसाबसा चालू होता.

यानंतर 2020 च्या सुमारास किशोर कडेकर आणि त्यांच्या पत्नीने आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पाणीपुरीचा व्यवसाय करण्याचे ठरवले आणि या दाम्पत्याने नाशिकमधील जत्रा हॉटेल परिसरात पाणीपुरीचा गाडा टाकला. यानंतर पुन्हा नि’र्बं’ध लावण्यात आले आणि हा व्यवसाय मोडकळीस आला.

यानंतर कडेकर दाम्पत्याने अखेर 2021 मध्ये त्याच ठिकाणी पाणीपुरी सेंटर उभे केले. हे दाम्पत्य मू’क’ब’धि’र असले तरीही त्यांनी आपला ग्राहकवर्ग चांगल्याप्रकारे जोपासला आहे. ग्राहकांशी हातवारे करून ते त्यांना काय हवं आहे हे जाणतात. आता रोजच्या ग्राहकांच्या ऑर्डर्स ते लगेच समजून घेतात.

तसेच नव्या ग्राहकांसाठी त्यांनी एक विशेष मेन्यूकार्ड तयार केले आहे. अशा प्रकारे त्यांचा हा व्यवसाय सुरळीत सुरू आहे. या दाम्पत्याने सगळ्यांसमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे. यामुळे अनेकजण या दाम्पत्याचा संघर्ष पाहून प्रेरीत होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page