गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी या व्यक्तीने वयाच्या 52 व्या वर्षी NEET परीक्षा उत्तीर्ण केली..

अहमदाबाद येथील एका 52 वर्षीय व्यावसायिकाने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ही कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून सर्वांनाच थक्क केले आहे. आम्ही बोलत आहोत, अहमदाबादच्या बोडकदेव भागातील रहिवासी प्रदीप कुमार सिंह यांच्याबद्दल. ज्यांनी NEET परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोर तयारी केली आणि ही परीक्षा उत्तीर्णही केली.

52 वर्षीय प्रदीप यांनी 720 पैकी 607 गुण मिळवले. ते NEET परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत कारण त्यांना गरीब विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग द्यायचे आहे, असे प्रदीप सांगतात. ते म्हणतात, “या वयात मला 98.98 टक्के गुण मिळाले आहेत, पण यामागे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन स्वत: डॉक्टर होण्याचा माझा हेतू नाही. मला गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत NEET कोचिंग सेंटर सुरू करायचे आहे.

या कामात त्यांचा मुलगा स्नेहंस याने त्यांना पूर्ण सहकार्य केल्याचे प्रदीप यांनी सांगितले. प्रदीप यांनी 1987 मध्ये दिल्लीत 71 टक्के गुणांसह 12वी पूर्ण केली होती. नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए (अर्थशास्त्र) पूर्ण केले आणि त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स केले.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मासिकांसाठी काम केले. ते म्हणाले की त्यांच्या मुलाने 2019 मध्ये NEET परीक्षा दिली आणि 595 गुण मिळवले. प्रदीप यांनी सांगितले की, जेव्हा त्यांचा मुलगा त्याची तयारी करू लागला तेव्हा त्यांनी NEET परीक्षेत रस घेतला. जेणेकरून गरीब मुलांना मोफत NEET कोचिंग देता येईल.

त्यांच्या या विचाराने अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एका अशा निर्माण झाली आहे, ज्यांनी मोठी स्वप्ने पाहिली असतील पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना ती पूर्ण करता आली नसतील. मात्र आता गरीब मुलेही त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page