शेती विकून घेतली रिक्षा, काही महिन्यांतच 22 हजारांचे चलान का’पल्यामुळे चालकाने स्वतःचे आयुष्य सं’पवले

कानपूर येथे राहत असलेले सुनील गुप्ता यांची घरची परिस्थिती चांगली नव्हती. त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून त्यांना चांगले उत्पादन मिळत नव्हते. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी काही महिन्यांपूर्वी शेती विकून त्यांनी नवीन रिक्षा घेतली होती. यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटत होता.

आधीच त्यांनी रिक्षा घेण्यासाठी कर्ज घेतले होते. पुरेसे उत्पन्न मिळात नसल्याने त्यांची चिंता वाढली होती. त्यातच त्यांच्या रिक्षावर 10 हजारांचे च’ला’न फाडले गेले. त्यांनतर एक-दीड महिन्यांनंतरही पुन्हा 12 हजारांचे च’ला’न फाडले.

एकूण रक्कम 22 हजारांपर्यंत पोहचली होती. रिक्षा घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे ही हप्ते त्यांना भरायचे होते आणि अशातच च’ला’न’ने त्यात अजून भर टाकली होती. त्यामुळे गुप्ता अजूनच चिंतेत पडले होते. एवढी रक्कम कशी भरणार? तसेच इतके पैसे कोठून आणणार? हे प्रश्न त्यांना सतत येत होते. त्यामुळे त्यांनी अखेर स्वतःला सं’प’वू’न टाकण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सुनील गुप्ता यांच्या पत्नी संगीता या त्यांची व्यथा मांडताना म्हणतात की, “आमच्या कुटुंबात ते कमवणारे एकटेच होते. आम्हाला एक लहान मुलगी ही आहे. आता आम्ही आमचे घर कसे चालवणार? अशा शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.”

या सर्व प्रकरणातून समोर येणाऱ्या तपशीलानंतर योग्य ती का’र’वा’ई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक सिंह यांनी सांगितले आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे दं’ड भरावा लागत आहे. यामुळे चांगली शिस्त जरूर लागत आहे. परंतु असे असले तरीही यामुळे अनेक गरीब चालकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page