तरुणीने दिली थेट प्रियकराच्या आईला ठणकावून सांगितलं! प्रियकरासोबत लग्न लाऊन द्या नाहीतर..

प्रेमाच्या अनेक नवनवीन घटना समोर येत असतात. प्रेमात पडलेली व्यक्ती आपल्या प्रेमाखातर काहीही करायला तयार असते. ते कशाचीही तमा बाळगत नाहीत. असेच एक प्रकरण नुकतेच जळगाव येथून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव मधील भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणीचे तेथील परीसरातच राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे. आपल्या प्रियकरासोबत लग्न करून द्या अशी मागणी करत या तरुणीने जे केले ते तुम्हाला एखाद्या चित्रपटातील कहाणी सारखे वाटेल परंतु हे खरं आहे.

या तरुणीने चक्क प्रियकराच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घालत तरुणाच्या आईला आणि वहिनीला शि’वी’गा’ळ केली. तसेच त्या दोघींना चापट बुक्क्यांनी मा’र’हा’ण देखील केली.

ही तरुणी एवढ्यावरच थांबली नाही तर जोपर्यंत मुलगा घरी परत येत नाही आणि तुम्ही लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही आणि विवाह करुन दिला नाही तर मी घरासमोरच काही तरी बरे-वाईट करेन अशी ध’म’की या तरुणीने प्रियकराच्या नातेवाईकांना दिली आहे.

या सर्व प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात या तरुणी विरोधात गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भडगाव पोलीस याचा आणखी तपास करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील या घटनेची चर्चा चांगलीच रंगली आहे. लोक यावर अनेक प्रतिक्रया देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page