आता पेट्रोलची किंमत कितीही वाढूदे, कारण ‘या’ व्यक्तीचे देशी जुगाड गाडीचे मायलेज दुप्पट करेल..

देशभारत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे अनेकजण हैराण झाले आहेत. परंतु, जर प्रतिलिटर सरासरी 40 ते 50 किलोमीटर देणारी तुमची बाईक जर प्रती लिटरला दुप्पट सरासरी देत असेल तर? ही गोष्ट तुम्हाला कदाचित खूप हास्यास्पद वाटेल पण हे खरे आहे.

कौशांबी येथील पिपरी पहाडपूर मधील रहिवासी असलेले विवेक कुमार पटेल यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी इंधन इजेक्शनच्या सिस्टममध्ये थोडे बदल करून बाईकची सरासरी दुप्पट केली आहे. यामुळे पेट्रोलची किंमत निम्म्यावर आली आहे.

विवेक कुमार पटेल यांनी केलेल्या आपल्या जुगाड तंत्राला ‘कार्बोरेटर जेट’ असे नाव दिले आहे. 12 वी पास असलेले विवेक हे घरात शटरिंगचे काम करत असत. परंतु, त्यांना नेहमीच काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती.

विवेक म्हणतात, “दुचाकीची सरासरी कशी वाढवाली जाईल यासाठी मी गेल्या वीस वर्षांपासून प्रयत्न करत आहे. सुरुवातीच्या काळात मला या कामात फारसे यश मिळाले नाही. परंतु, मी अभ्यास करत यात यश मिळवले आहे.” विवेक यांनी आपल्या कामातून वेळ काढून बाईकचे तंत्र नीट समजून घेतले आणि त्याबद्दल त्यांनी खूप अभ्यास केला आणि अखेर 2016 मध्ये त्यांना सरासरी वाढवण्यात काही प्रमाणात यश मिळाले.

विवेक यांनी लावलेल्या या नवीन संशोधनानंतर त्यांना 23 ऑक्टोबर 2018 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 25,000 रुपयांचा अभिनव पुरस्कार बहाल केला आहे. हा पुरस्कार उत्तर प्रदेश मधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते देण्यात आला होता.

यानंतर विवेक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांचा झालेला सन्मान यामधून त्यांना एक नवीन प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आणखी कठोर परिश्रम करून अखेर त्यांनी ‘कार्बोरेटर जेट’चा शोध लावला. ज्याच्या मदतीने त्यांनी बाईकची सरासरी दुप्पट केली आहे.

‘कार्बोरेटर जेट’चा शोध लावल्यानंतर विवेक यांनी आतापर्यंत 500 हून अधिक दुचाकीमध्ये ‘कार्बोरेटर जेट’ बसवले आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, हे ‘कार्बोरेटर जेट’ बसवल्यानंतर कोणतीही समस्या येत नाही. यामुळे पेट्रोल आवश्यकतेनुसार वापरले जाते आणि सरासरी वाढते. विवेक यांनी लावलेला हा अनोखा शोध अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page